Saturday, December 19, 2009

Hey age study karayach ki kamvaych????

Rojchya routine life prmane 83 pakdayachi ani officecha rasta dharayacha..rojchi amha mothyanchi office la jaychi ghayi aste...pan pratek Shanivari na ek veglach pahayala miltt.

Saturdayla tashi farshi gardi nastech pan FS-metro chya stopla bus ali ki mag 5 - 6 begarchi lahan mul hee 83 pakdtat. Tya Saturdela ek prakare tyanchi sudha kuthe tari jaychi ghai aste!!mazya mahiti pramane tee sagli mull hee "Get Way of India" la utratat ani tee teethe paise  magtat yenarya janarya kadun.

ethe hey sagvas  vatt ki,tyanch te age school madhe janyach astt...ani tya age madhe te beg magtat??


Thoda vichar kelyavar mala sudha neet kalpana ali ki...apan jya age madhe apan tari school madhe gelo, study keli,...tya age madhe hyana kai karavv lagat ahe??


Hya var Uttar sudha kai ahe kiva asel te kalat nahi???

Wednesday, November 25, 2009

निरागस मन :

आज माझ्या लहान बहिणीचा म्हणजे गुड्डाचा वाढदिवस,म्हणून सकाळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी मी फोन केला आणि गंमत म्हणून जेव्हा मी तिच्याकडे वाढदिवसाची पार्टी मागितली तर गुड्डाच उत्तर असं कि, ताई तुला पार्टी हि पुढच्या गणपतीला देते. थेट पुढच्या गणपतीला? का गं ?..अरे मग मधले सगळे दिवस गेले कुठे?means सांगण्याचा मुद्धा हा कि हि लहान मुल किती निरागसपणे आपली उत्तर देत असतात आणि महत्वाच म्हणजे जाणते आणि अजाणतेपणे त्यांच्या त्या उतराने कधी कोणाच मनही दुखवल जात नाही पण बघा ना आपण जेव्हा मोठ होतो तेव्हा आपली हि इच्छा असते कि कोणीच आपला वाढदिवस विसरू नये, न चुकता- न विसरता सगळ्यांनी आपल्याला त्यादिवशी फोन करायला हवा पण लहान मुलाचं जगच किती वेगळ असत,त्यांना जेव्हा आपण फोन करतो तेव्हा ती बिचारी नुस्त आपण जे काही बोलत असतो ते निमूटपणे आपल एकण्याच काम हे करत असतात.कोणत्याच गोष्टीची मोठी आशा हि त्यांच्या मनामध्ये नसते,बिचारी स्वताच्या वाढदिवसाच गिफ्टसुद्धा मागायचं विसरतात...
ह्यातून ना हा एक विचार मनात डोकावतो कि लहान मुलांना आपण किती ओरडतो तस गुड्डालासुद्धा बरयाच वेळा मी तिला तिच्या अभ्यासावरून ओरडले असेन पण लहान मुल ति ते मनात कधी ठेवतच नाहीत आणि आपण मोठे लोक आपल्यामध्ये जर भांडण झालीच तर ती कायमची का मनात ठेवतो. का ती विसरू शकत नाही आणि का पाहिल्यासारख बोलल जात नाही. म्हणून कधी कधी वाटत ना कि ..कधी मोठ हे होऊच नये, नेहमी लहानच रहाव!!!!

Monday, November 23, 2009

26 / 11 ना हो दोबारा...

२६ नोव्हेंबर २००८, रोजी मुंबईवरझालेल्या आतंकवादी हल्ल्याला आता १ वर्ष पूर्ण होईल.ज्यादिवशी हा हल्ला झाला तेव्हा आम्ही पण जवळजवळ रात्री ८ . १५ वाजेपर्यंत आमच्या कुलाबायेथील ऑफिस मध्ये काम करत होते. थोडक्यात दहशतवाद्याची वेळ चुकली म्हणून नाहीतर माझ्या बाततीतही काय घडल असत? ह्याची कल्पना करवत नाही.मला तर अस वाटत कि,त्या दिवशी दहशतवाद्याची वेळ ही चुकायला नको हवी होती तर त्यांची ती बोटच समुद्रामध्ये वादळ येऊन कुठेतरी बुडायला हवी होती.अस का झाल नाही?



कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जे काही कृत्य केल ते अक्षरशा मानवतेला कालीम्बा फासणार आहे.ह्या अमानुष हल्याची कल्पना नसलेल्या नागरिक आणि सुरक्षा रक्षकांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले.त्या दिवशी घडलेल्या हल्ल्यामुळे आनेकाना अपंगत्व आल,काहिच्या जख्मा ह्या अजुनही तश्याच आहेत. आतंकवादयानी फेकलेल्या ग्रानाईटचे छरे हे काहीच्या शरीरातील शिरांमध्ये अजुनही आहेत आणि त्याच्या वेदना ह्या त्यांना आता आयुष्यभर भोगाव्या लागणार आहेत.

ह्या हल्ल्यात आपल्या जीवाची पर्वा न करता किवां आपल्या पाठी असलेल्या कुटुंबाचा जरा सुद्धा विचार न करता ज्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलीस जवानांनी आतंकवादाच्या तावडीतून अनेक  नागरिकांना सुखरूप सोडवले आणि स्वता मात्र शहीद झाले अश्या  सर्वं शहीद झालेल्या थोर कर्तबगार पोलीस आणि वीर जवानांना परत एकदा Hats off to them all.

ह्या हल्यानंतर मुंबई ही परत एकदा उभी तर राहिली आणि ह्या पुढेही जर का अशी वेळ परत आलीच तर आता ही मुंबई तिचा सामना करायला ही तेवढीच तयार आहे.पण दुख हे एकाच गोष्टीच वाटत कि, अजूनही ह्यापुढे  अशे किती हल्ले विनाकारण आपण झेलत राहणार आणि त्यात निष्कारण, निष्पाप  जीव हे मारले जाणार?

Friday, November 20, 2009

सवाल एक डझन ????

आज मूड आहे ब्लॉगवर लिहिण्याचा..पण तसकाही एकदम सुचतच नाही आहे??.OK. मी कि नाही आज "एक डझन सवाल"..ह्या सदरावर माझ्याबद्दलची एक डझन उत्तर सांगते... आतातरी हेच सुच्त आहे..हा पण मी जे काही इथे ब्लॉगवर लिहिते ते सगळ खर्र आहे हा..थापा तर मुळीच नाही मारत.. चला तर मग लागा कामाला..means लिखाणाला ओ!!!

बर्थडेट - २५ September, ('-')
छंद -- वाचन,बागकाम. ('-') ('-')
बेस्ट फिचर्स -- केस आणि आवाज , आणि माझे सुंदर डोळे . ('-') ('-') ('-')
फ्रेंड्स कोणत्या नावाने ओळखतात -- सुची. ('-') ('-') ('-') ('-')
कोणत्या सेलीब्रेटीबरोबर डेटला जायला आवडेल -- अमिताभ बच्चन ('-')
आवडती डीश आणि ड्रिंक -- आईच्याहातचं भात आणि गोडवरण आणि ड्रिंकमध्ये सनशाइन.('-') ('-') ('-') ('-') ('-')
टीवीवरील नावडता शो -- टी वी जास्त बघतच नाही.(!.!) (!.!) (!.!)
स्वतःविषयी इतरांना माहित नसलेली गोष्ट-मला तस छान गाताही येत!!(पण कधीतरीच)(!.!) 
लाइफमंत्रा--सतत स्वतःही हसतं आणि आनंदी राहायच आणि दुसऱ्यांनासुद्धा हसतं आणि आनंदी ठेवायच..('-') ('-') ('-') ('-') ('-')  ('-') ('-') ('-') ('-') ('-')
पाहिलं अडडीक्शन --  वाचन.('.') ('.') ('.')
बेस्ट फ्रेंड -- कोणीही नाही.('?') ('?')
इतिहासातील कोणती घटना बदलायला आवडेल -- २६ नोव्हेंबर,२००८ ला दहशतवादयांनी मुंबईवर केलेला भीषण हल्ला. (';')(';')(';')(';') 













Friday, November 13, 2009

आठवणीतली साठवण..

ही एक छोटीशी साठवण:):):).पण आपल्याला ही बरच काही सांगूनहि जाते हा...म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे कि,मित्रानो तुम्ही कधी झाडांशी बोलून बघितलं आहात का? आ मला माहित आहे..आता तुम्ही हे बोलाल कि,हि काय मूर्ख मुलगी आहे??..हलीच्या दिवसात आम्हाला आमच्या घरातल्याशी,मित्रमंडळीशी एवढंच काय तर शेजाऱ्याशी सुद्धा बोलायला वेळ नाही.मग त्यात झाडाशी काय कर्म बोलणार आम्ही!!!..अहो हो..पण मला अस सांगायचं आहे कि ..म्हणजे हि माझ्या आठवणीतली साठवण..म्हणजे माझ्या लहानपनीची आठवण हो!!.जेव्हा मला हि उनाडकीगिरी करायला भरपूर वेळ असायचा आणि मग असच काहीतरी करत राहायचं..आता एकदम मुद्याचच सांगते हा,आमच्या घरी ना एक सुंदर जास्वंदीच भल मोठ झाड होत आणि त्यावेळी त्या झाडाला नियमित पाणी घालणे,खत घालणे.धूळ बसलेल्या पानांनवर पाणी शिपंडणे..इत्यादी हि सगळी माझी काम मी करत असायचे.अगदी कहर म्हणजे तीसुद्धा दिवसातून ४ / ४ वेळा?? आणि एके दिवशी माझ्या अस लक्षात आल कि,हे माझ जास्वंदीच झाड अचानकपणे फुलं देइनास झालय???दिवसाला जे १२ - १५ फुले दयाच आणि त्यामुळे आमचा संपूर्ण देव्हारा हा लाल रंगाने उजळून दिसायचा.:):)पण अस झाडाला आता झाल तरी काय?? ..आईला सुद्धा मी, हाच प्रश्न विचारून हैराण केल?त्यावर ती मला म्हणाली कि,तू एक काम कर..तूना विचार तुझ्या झाडाला कि, अरे तुझ काही बिनसलं.का?रागवलास का?की मी काही चुकीच वागले तुझ्याशी,बोल त्याच्याशी जरा.नुस्त पाणी घालून आणि त्याची निगा राहून चालत नसत.ते सुद्धा संजीव जीवच आहेत ना?मग त्यांना नाही बोलावस वाटत?, ए ऐकावस वाटत?त्यानाही माणसांसारख्याच भावभावना असतात आणि मग... मग मी माझ्या झाडाशी बोलले,त्याला विचारल.... तू रागवला आहेस का?का कळ्या येत नाहीत तुला,असा का तुझा रंग काळपट पडला.मी काही चुकीच वागले का?त्यावेळी मी एकटीच वेड्यासारखी झाडाशी किती वेळ बोलत असायचे..आणि हे माझ झाड मला काही उत्तर बोलूनच दाखवायचे नाही?.ते,ते देणार तरी कस??पण माहित आहे तुम्हाला ह्या माझ्या झाडाने माझ्या प्रश्नाच उतर हे मला जरी बोलून नाही दिल ना पण ते त्याने करून दाखवलं..माझ्या ह्या झाडाने त्यावेळी १ आठवड्याच्या आत कळ्या दिल्या:):):)आणि नवल म्हणजे त्याच्या फांद्यानावर,पानांनवर,मुळांवर एक तजेला आला आणि आता ते परत पाहिल्यासारख हसायला लागल:):):)

सांगायचा मुद्दा हा कि,बघा मित्रानो..आपल्यासारखंच झाडा-फुलांना सुद्धा वाटत ना कि,त्यांच्याशीसुद्धा कोणीतरी बोलाव,हसावं..अहो ते सुद्धा एका प्रकारे संजीवच आहेत ना???

Friday, October 23, 2009

एक दुख कि जे मनातून केव्हाच न जाणार?????

मित्रानो..हा माझ्या आयुषतला पहिला वाईट अनुभव...कि जो केव्हाच आणि कधीच न विसरता येणारा आहे.



ह्यातून मला बरच काही शिकायला हि मिळाल, मला माहित आहे कि असे बरे वाईट अनुभव हे सगळ्यांचाच जीवनात येत असतात.पण मला हे सांगावस वाटत कि जर का आपण एखद्या वैक्तीशी सतत चांगल वागत राहिलो,मनात काहीहि,कोणतीच वाईट गोष्ट हि तिच्या बदल न ठेवता तर मग ती समोरची वैक्ती हि आपल्याशी इतकी वाईट का वागू शकते??शेवटी प्रश्न्न हा पडतो कि,मी अशी काय चूक केली आहे किवा माझ्या हातून अस काय घडल होत आणि कधी कोणाला दुखवल कि ज्याची विनाकारण मला शिक्षा मिळाली.जर समोरच्याला वाटत कि आपण त्यांना समजून घ्याव..मग मला हि तसच वाटत ना कि आपल्याला सुधा कोणीतरी समजून घ्याव? चुका ह्या फक्त एकाकडूनच होत नसतात.त्या दोन्ही बाजूने घडत असतात.सांगायचा मुद्दा हा कि "टाळी हि एका हाताने कधीच वाजत नसते" जर प्रोब्लेम फेस करता येत नसतील तर ते कधीच निर्माण करू नयेत आणि प्रोब्लेम झालेच तर त्याला तोंड देण्याची हि तयारी ठेवली पाहिजे.


पण त्यावैक्तीला शेवटी हेच सांगावस वाटत कि, कृपा करून,कृपा करून परत अश्याप्रकारे कधीच कोणाबरोबर वागू नका.तुमच्यासाठी हि एक मस्ती,गमत असेल.पण समोरचा तो ते कितपत सहन करू शकेल त्याचा हि विचार करा!!!


पण बर्रच झाल कि हे अस घडल ते!!!..नाहीतर समोरच्या वैक्तीच फक्त एकच रूप आजपर्यंत बघायला मिळाल असत.

Monday, October 12, 2009

Bole Toh.....बोले तोः

मित्रहो  बोले तोः हे  वर्तमानपत्रातील एक सदर वाचल आणि त्यानिमिताने मलाही काही असच लिहावस वाटल!! ते अस कि, !!!!!

आई म्हणजे : सर्वस्व
पुस्तक म्हणजे : मित्र
मित्र म्हणजे :  अनुभव
यश म्हणजे : आनंद
सुख म्हणजे : समाधान
प्रवास म्हणजे : नाविण्य
काम म्हणजे : श्रद्धा
घर म्हणजे : मायेचीसावली
माणूस म्हणजे : निर्मिती
मुंबई म्हणजे : कष्ट

Monday, October 5, 2009

Workaholic...

Now don't have time for time pass only !!!! :P hyalach mahntat workaholic ...hahhahha  

Thursday, October 1, 2009

"Ann he Purnabramha"

"Ann hey Purnabramha" as marathi madhe mahntat..ani ase ethe lihinya magch karan hey ki...mala maza college madhla ek prasang athavala...tho prasang asa hota ki .amchya politics hya subject chya madam tyani purn class chi 30 marks sathi written exam ghetli hoti..Jya lesson var exam hoti tyach caption hott."Rights and Duties"..mam ni amhala tumche rights ani duties kontya kontya ahet he vicharll hott exam paper madhe...tyveli  mazya tas properly ani syllabus ch answer lihaych ahe hey patkan dokyat al nahi ani me "jevne ha apla hakk ahe"...ani mahnun mee tatatla konta hee padarth balance nn thevta jevte..asss PRAMANIK pane sangitll means lihil hott..ani tevha mazya hya utaravar matrr mam sakatt sampurn class ha mala haslela hota..pan mala te kahi tyaveli kahi kalach nahi kiva kahi vegl vatll pan nahi...ki hee lok mala ka hasta ahet te?????ani ata toh prsang athvla ki matrr kaltt ki me mala xat kai lihaych hott ani kai lihil hott :)

Thursday, September 17, 2009

You should know na?

Suchi---too Good!!
Rupal---little Good!!
Bhumi---not Good??????????????

Wednesday, September 16, 2009

No Horn Plzzzzzzzz!!!!

"No horn …please"…ghabru naka..hey kahi signal che Kurukshetra nahi…. "it's a slogan on noise pollution" .mahnje na…kaal me kama varun jevha ghari jat hote…tevhachi goshte…majhya pudhe doon mule motamothane kahi tari bolat,badbadat chaleli hoti..tyatlya ekacha break up zalela asava bahutek!!!..ase mala tyacha bolnayavarun tari vatle.ata tumhi mahnal tyat kai navin?? Aho pan mala sangayche ase ahe ki. tyanch boln he jara jastech mothya avaja che hote..tase mala dusrayncha goshti aikayachi kiva aplyashi sambadndhit naslelya gostit nak khupsnyachi savai nahi ? Tar kai hottt na…ki,tyatla ek saangat hota..mee jya mulivar prem karto tee mulgi majhe call ghetch  karat nahi..kai zale tari kai?contact karu kasa?ase kahi hote?ani tyancha pudhe ajun ek mulga challa hota..surprisingly tyacha T-Shirt chya back side var NO HORN PLEASE (manje noise pollution nako :-) ) ha slogan hota..ani to sarkha sarkha tyanchakade mage valun valun tayana te indirectly suchvat hee hota..pan tya beecharayana kahi kalatach navte...ata mala kai sangaych ahe te tumhala kalle aselch na??moral of d story kai ahe ki....krupa karun mothya mothya ne bolu naka!!!!!that's all :P 

Tuesday, September 15, 2009

first blog....mind is empty

ajchi survat kashi karu?kai leehu?..kahi kalat nahi.ammmm ha pahilya pratham naman ...SHRI Ganeshala....hmmm.....barobar na...mazya gudy gudy mitrano...mla ani mazya likhanala hasu naka...ani hasayala all tar matrr pot bharun hasa...it's my first blog...so i dn't know wat to write...presently working...so kahi suchat nahi..ani lehyachh khup kahi ahe...pan tevdha velach milat nahi....ajj evdh pure..udya matr mag ajun kahi tari lihin..jas jas suchat jayil tas..