Wednesday, November 25, 2009

निरागस मन :

आज माझ्या लहान बहिणीचा म्हणजे गुड्डाचा वाढदिवस,म्हणून सकाळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी मी फोन केला आणि गंमत म्हणून जेव्हा मी तिच्याकडे वाढदिवसाची पार्टी मागितली तर गुड्डाच उत्तर असं कि, ताई तुला पार्टी हि पुढच्या गणपतीला देते. थेट पुढच्या गणपतीला? का गं ?..अरे मग मधले सगळे दिवस गेले कुठे?means सांगण्याचा मुद्धा हा कि हि लहान मुल किती निरागसपणे आपली उत्तर देत असतात आणि महत्वाच म्हणजे जाणते आणि अजाणतेपणे त्यांच्या त्या उतराने कधी कोणाच मनही दुखवल जात नाही पण बघा ना आपण जेव्हा मोठ होतो तेव्हा आपली हि इच्छा असते कि कोणीच आपला वाढदिवस विसरू नये, न चुकता- न विसरता सगळ्यांनी आपल्याला त्यादिवशी फोन करायला हवा पण लहान मुलाचं जगच किती वेगळ असत,त्यांना जेव्हा आपण फोन करतो तेव्हा ती बिचारी नुस्त आपण जे काही बोलत असतो ते निमूटपणे आपल एकण्याच काम हे करत असतात.कोणत्याच गोष्टीची मोठी आशा हि त्यांच्या मनामध्ये नसते,बिचारी स्वताच्या वाढदिवसाच गिफ्टसुद्धा मागायचं विसरतात...
ह्यातून ना हा एक विचार मनात डोकावतो कि लहान मुलांना आपण किती ओरडतो तस गुड्डालासुद्धा बरयाच वेळा मी तिला तिच्या अभ्यासावरून ओरडले असेन पण लहान मुल ति ते मनात कधी ठेवतच नाहीत आणि आपण मोठे लोक आपल्यामध्ये जर भांडण झालीच तर ती कायमची का मनात ठेवतो. का ती विसरू शकत नाही आणि का पाहिल्यासारख बोलल जात नाही. म्हणून कधी कधी वाटत ना कि ..कधी मोठ हे होऊच नये, नेहमी लहानच रहाव!!!!

1 comment:

  1. karech... lahanpan, bachpan, childhood kuthlyahe bhashet bola... te maansa chya jeevanache sarwaat sundar kaal aste... te jevva aste tevva tyachi janiv naste aaplyala, pan ekda te nighun jaate tya nantarech kalte ki te kiti manje kiti anmol hote...

    ReplyDelete