Tuesday, March 17, 2015

दोन वाक्य आपुलकीची

दोन वाक्य आपुलकीची 


प्रश्न  : मुळात आपुलकी म्हणजे काय ओ ??
उत्तर : आपुलकी म्हणजे in-short मध्ये "आपलेपणा".    
  थोड सविस्तर सांगायचं झालच तर,"जिव्हाळा".म्हणजेच एखाद्या वैक्ती,एखाद्या वस्तू , एखाद् ठिकाण,गाव,शहर ह्या बद्धल आपल्याला वाटलेलं आपलेपण.मग ते काही क्षण,काही तास,तर काही वर्षासाठी असत किवां मग कायम  स्वरूपी सुद्धा असत.तसच  ह्या भावनेतून एक प्रकारचा "आदरभाव"हा सुद्धा व्यतीत होत असतो.आणि म्हणून मला ह्या भावरसाबद्धल ऐथें बोलावसं वाट्त.  ते ह्या करिता कि,रोजच्या आपल्या आयुष्यात येणारे,दिसणारे,भावणारे काही अनुभव,प्रसंग हे असतात .जे मनाला नकळत आपलेपणा देऊन जातात.          
  आता आणखीन थोडं सविस्तर हा.. म्हणजे बघा ना कस आहे की , मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.आणि तो एकटा कधीच राहू शकत नाही.त्याला काहिही झाल तरी समाज आणि कुटुंब व्यवस्था follow हि करावीच लागते. ही मनुष्याची वैशिष्ठ अगदी आदि काळापासून पासून चालत आलेली आहेत. तरीही मला हा प्रश्न पडतो कि,आताचा मनुष्यप्राणी हा कितीही श्रीमंत , शिकलेला असला तरी त्याला त्याच्या आजूबाजूला असलेल्या घोळक्यासोबत रहावच लागत ,जमवून घ्यावंच लागत. पण मग हाच माणूस WhatsApp ह्या messaging app मध्ये असलेल्या status सारखं का वागतो ? अति status धारी सारखं का वागत असतो. अभिमान आणि गर्व ह्या सारख्या काहीही कामाच्या नसलेल्या गोष्टींना का अतिमहत्व देत असतो.   
  बर्र महत्व पण एवढं कि समोरचा त्याला चांगल्या भावनेने मदत करतो आहे ह्याच त्याला काहीहि पडलेलं पण नसत. म्हणजे मी रोज ज्या ८३ ह्या बस ने कामाला जाते.तेव्हा ८३ चे रोजचे Driver काका हे खरच माणुसकी म्हणून नीट चांगल्या पद्धतीने प्रवाशांना त्यांच्या बस थांब्यावर सोडत असतात.काहीना तर मध्येच चढू देतात.का तर बस चुकू नये म्हणून,तर काहींना stop च्या अधीच उतरवतात.पण काही लोकं त्यांचे अभार तर सोडा पण मोठ्या गुम्शातच Driver काकांकडे बघत उतरतात.बंर ते त्यांना पाठून गाडी येते आहे.सांभाळून उतरा बोलले तरी हे स्वतःच्याच अभिमानात.आमचे Driver काका इथे आपुलकी जपत असतात तर ते लोक त्यांचा इगो सावरत असतात. 
      माझा पाय मध्यंतरी आता खूप पाय जोरात दुखत होता .एवढा की , मला bus ची पहिली पायरी पण चढणं कठीण होत होत .Driver काकांना माझं ते कष्ट करून Bus मध्ये चढण . अक्षरशा त्यांच्या मनाला वाईट वाटत होत . मी माझ्या समाधाना साठी त्यांना बोलायचे काका थोडी कमी उंचीची पायरी असलेली bus डेपो मधून आणा ना . कारण मला ह्या दुखण्यात कुलाबा गाठण हे फक्त ८३ नेच प्रवास करण फायद्याचं होत म्हणजे दोन दोन bus मी करूच शकत नव्हते. पण काकांनी बरोबर लक्षात ठेवून कमी उंचीची पायरी असलेली बस हि ते आणायला लागले . बाकी काही नसत पण कधी कधी आपण आपले पणाने जे दोन शब्द बोलतो इतरांशी ते त्यांना हि कुठे तरी आपल्याविषयी आपुलकी जाणवून देतात . 
      मोठेपणा मी  इथे पुढे माझा हा सांगत नाही. पण खरच जे आपल्या ओळखीचे पालखीचे  नसतात ना ? ते सुद्धा मला  मी  लवकर, पटकण  बरी होशील असा छानसा आशीर्वाद देऊन जातात . कि ज्याची आपण मागणी सुद्धा केली नसते कि, आपल्या मनात सुद्धा तसं आलेल नसत . पण अप्रूप ह्या गोष्टीच वाटत कि आपल्याच बिल्डिंग मध्ये राहणारी , ओळखीची अशी  काही लोकं. जी अगदी धक्के मारून पुढे जातात . म्हणजे एवढी का ती निगरगठ्ठ  असतात . तेच कळत नाही. दोन वाक्य इथे आपुलकीची तर सोडाच पण निदान त्यांना थोडं थांबा मला पुढे जाऊंदे आधी हे बोलण पण सुचत नाही ... अअअ SORRY जमत नाही.  
आपुलकी असेल तर जीवन सुंदर 
गालातल्या गालात हसू असेल तर चेहरा सुंदर
 आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर