Wednesday, November 25, 2009

निरागस मन :

आज माझ्या लहान बहिणीचा म्हणजे गुड्डाचा वाढदिवस,म्हणून सकाळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी मी फोन केला आणि गंमत म्हणून जेव्हा मी तिच्याकडे वाढदिवसाची पार्टी मागितली तर गुड्डाच उत्तर असं कि, ताई तुला पार्टी हि पुढच्या गणपतीला देते. थेट पुढच्या गणपतीला? का गं ?..अरे मग मधले सगळे दिवस गेले कुठे?means सांगण्याचा मुद्धा हा कि हि लहान मुल किती निरागसपणे आपली उत्तर देत असतात आणि महत्वाच म्हणजे जाणते आणि अजाणतेपणे त्यांच्या त्या उतराने कधी कोणाच मनही दुखवल जात नाही पण बघा ना आपण जेव्हा मोठ होतो तेव्हा आपली हि इच्छा असते कि कोणीच आपला वाढदिवस विसरू नये, न चुकता- न विसरता सगळ्यांनी आपल्याला त्यादिवशी फोन करायला हवा पण लहान मुलाचं जगच किती वेगळ असत,त्यांना जेव्हा आपण फोन करतो तेव्हा ती बिचारी नुस्त आपण जे काही बोलत असतो ते निमूटपणे आपल एकण्याच काम हे करत असतात.कोणत्याच गोष्टीची मोठी आशा हि त्यांच्या मनामध्ये नसते,बिचारी स्वताच्या वाढदिवसाच गिफ्टसुद्धा मागायचं विसरतात...
ह्यातून ना हा एक विचार मनात डोकावतो कि लहान मुलांना आपण किती ओरडतो तस गुड्डालासुद्धा बरयाच वेळा मी तिला तिच्या अभ्यासावरून ओरडले असेन पण लहान मुल ति ते मनात कधी ठेवतच नाहीत आणि आपण मोठे लोक आपल्यामध्ये जर भांडण झालीच तर ती कायमची का मनात ठेवतो. का ती विसरू शकत नाही आणि का पाहिल्यासारख बोलल जात नाही. म्हणून कधी कधी वाटत ना कि ..कधी मोठ हे होऊच नये, नेहमी लहानच रहाव!!!!

Monday, November 23, 2009

26 / 11 ना हो दोबारा...

२६ नोव्हेंबर २००८, रोजी मुंबईवरझालेल्या आतंकवादी हल्ल्याला आता १ वर्ष पूर्ण होईल.ज्यादिवशी हा हल्ला झाला तेव्हा आम्ही पण जवळजवळ रात्री ८ . १५ वाजेपर्यंत आमच्या कुलाबायेथील ऑफिस मध्ये काम करत होते. थोडक्यात दहशतवाद्याची वेळ चुकली म्हणून नाहीतर माझ्या बाततीतही काय घडल असत? ह्याची कल्पना करवत नाही.मला तर अस वाटत कि,त्या दिवशी दहशतवाद्याची वेळ ही चुकायला नको हवी होती तर त्यांची ती बोटच समुद्रामध्ये वादळ येऊन कुठेतरी बुडायला हवी होती.अस का झाल नाही?



कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जे काही कृत्य केल ते अक्षरशा मानवतेला कालीम्बा फासणार आहे.ह्या अमानुष हल्याची कल्पना नसलेल्या नागरिक आणि सुरक्षा रक्षकांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले.त्या दिवशी घडलेल्या हल्ल्यामुळे आनेकाना अपंगत्व आल,काहिच्या जख्मा ह्या अजुनही तश्याच आहेत. आतंकवादयानी फेकलेल्या ग्रानाईटचे छरे हे काहीच्या शरीरातील शिरांमध्ये अजुनही आहेत आणि त्याच्या वेदना ह्या त्यांना आता आयुष्यभर भोगाव्या लागणार आहेत.

ह्या हल्ल्यात आपल्या जीवाची पर्वा न करता किवां आपल्या पाठी असलेल्या कुटुंबाचा जरा सुद्धा विचार न करता ज्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलीस जवानांनी आतंकवादाच्या तावडीतून अनेक  नागरिकांना सुखरूप सोडवले आणि स्वता मात्र शहीद झाले अश्या  सर्वं शहीद झालेल्या थोर कर्तबगार पोलीस आणि वीर जवानांना परत एकदा Hats off to them all.

ह्या हल्यानंतर मुंबई ही परत एकदा उभी तर राहिली आणि ह्या पुढेही जर का अशी वेळ परत आलीच तर आता ही मुंबई तिचा सामना करायला ही तेवढीच तयार आहे.पण दुख हे एकाच गोष्टीच वाटत कि, अजूनही ह्यापुढे  अशे किती हल्ले विनाकारण आपण झेलत राहणार आणि त्यात निष्कारण, निष्पाप  जीव हे मारले जाणार?

Friday, November 20, 2009

सवाल एक डझन ????

आज मूड आहे ब्लॉगवर लिहिण्याचा..पण तसकाही एकदम सुचतच नाही आहे??.OK. मी कि नाही आज "एक डझन सवाल"..ह्या सदरावर माझ्याबद्दलची एक डझन उत्तर सांगते... आतातरी हेच सुच्त आहे..हा पण मी जे काही इथे ब्लॉगवर लिहिते ते सगळ खर्र आहे हा..थापा तर मुळीच नाही मारत.. चला तर मग लागा कामाला..means लिखाणाला ओ!!!

बर्थडेट - २५ September, ('-')
छंद -- वाचन,बागकाम. ('-') ('-')
बेस्ट फिचर्स -- केस आणि आवाज , आणि माझे सुंदर डोळे . ('-') ('-') ('-')
फ्रेंड्स कोणत्या नावाने ओळखतात -- सुची. ('-') ('-') ('-') ('-')
कोणत्या सेलीब्रेटीबरोबर डेटला जायला आवडेल -- अमिताभ बच्चन ('-')
आवडती डीश आणि ड्रिंक -- आईच्याहातचं भात आणि गोडवरण आणि ड्रिंकमध्ये सनशाइन.('-') ('-') ('-') ('-') ('-')
टीवीवरील नावडता शो -- टी वी जास्त बघतच नाही.(!.!) (!.!) (!.!)
स्वतःविषयी इतरांना माहित नसलेली गोष्ट-मला तस छान गाताही येत!!(पण कधीतरीच)(!.!) 
लाइफमंत्रा--सतत स्वतःही हसतं आणि आनंदी राहायच आणि दुसऱ्यांनासुद्धा हसतं आणि आनंदी ठेवायच..('-') ('-') ('-') ('-') ('-')  ('-') ('-') ('-') ('-') ('-')
पाहिलं अडडीक्शन --  वाचन.('.') ('.') ('.')
बेस्ट फ्रेंड -- कोणीही नाही.('?') ('?')
इतिहासातील कोणती घटना बदलायला आवडेल -- २६ नोव्हेंबर,२००८ ला दहशतवादयांनी मुंबईवर केलेला भीषण हल्ला. (';')(';')(';')(';') 













Friday, November 13, 2009

आठवणीतली साठवण..

ही एक छोटीशी साठवण:):):).पण आपल्याला ही बरच काही सांगूनहि जाते हा...म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे कि,मित्रानो तुम्ही कधी झाडांशी बोलून बघितलं आहात का? आ मला माहित आहे..आता तुम्ही हे बोलाल कि,हि काय मूर्ख मुलगी आहे??..हलीच्या दिवसात आम्हाला आमच्या घरातल्याशी,मित्रमंडळीशी एवढंच काय तर शेजाऱ्याशी सुद्धा बोलायला वेळ नाही.मग त्यात झाडाशी काय कर्म बोलणार आम्ही!!!..अहो हो..पण मला अस सांगायचं आहे कि ..म्हणजे हि माझ्या आठवणीतली साठवण..म्हणजे माझ्या लहानपनीची आठवण हो!!.जेव्हा मला हि उनाडकीगिरी करायला भरपूर वेळ असायचा आणि मग असच काहीतरी करत राहायचं..आता एकदम मुद्याचच सांगते हा,आमच्या घरी ना एक सुंदर जास्वंदीच भल मोठ झाड होत आणि त्यावेळी त्या झाडाला नियमित पाणी घालणे,खत घालणे.धूळ बसलेल्या पानांनवर पाणी शिपंडणे..इत्यादी हि सगळी माझी काम मी करत असायचे.अगदी कहर म्हणजे तीसुद्धा दिवसातून ४ / ४ वेळा?? आणि एके दिवशी माझ्या अस लक्षात आल कि,हे माझ जास्वंदीच झाड अचानकपणे फुलं देइनास झालय???दिवसाला जे १२ - १५ फुले दयाच आणि त्यामुळे आमचा संपूर्ण देव्हारा हा लाल रंगाने उजळून दिसायचा.:):)पण अस झाडाला आता झाल तरी काय?? ..आईला सुद्धा मी, हाच प्रश्न विचारून हैराण केल?त्यावर ती मला म्हणाली कि,तू एक काम कर..तूना विचार तुझ्या झाडाला कि, अरे तुझ काही बिनसलं.का?रागवलास का?की मी काही चुकीच वागले तुझ्याशी,बोल त्याच्याशी जरा.नुस्त पाणी घालून आणि त्याची निगा राहून चालत नसत.ते सुद्धा संजीव जीवच आहेत ना?मग त्यांना नाही बोलावस वाटत?, ए ऐकावस वाटत?त्यानाही माणसांसारख्याच भावभावना असतात आणि मग... मग मी माझ्या झाडाशी बोलले,त्याला विचारल.... तू रागवला आहेस का?का कळ्या येत नाहीत तुला,असा का तुझा रंग काळपट पडला.मी काही चुकीच वागले का?त्यावेळी मी एकटीच वेड्यासारखी झाडाशी किती वेळ बोलत असायचे..आणि हे माझ झाड मला काही उत्तर बोलूनच दाखवायचे नाही?.ते,ते देणार तरी कस??पण माहित आहे तुम्हाला ह्या माझ्या झाडाने माझ्या प्रश्नाच उतर हे मला जरी बोलून नाही दिल ना पण ते त्याने करून दाखवलं..माझ्या ह्या झाडाने त्यावेळी १ आठवड्याच्या आत कळ्या दिल्या:):):)आणि नवल म्हणजे त्याच्या फांद्यानावर,पानांनवर,मुळांवर एक तजेला आला आणि आता ते परत पाहिल्यासारख हसायला लागल:):):)

सांगायचा मुद्दा हा कि,बघा मित्रानो..आपल्यासारखंच झाडा-फुलांना सुद्धा वाटत ना कि,त्यांच्याशीसुद्धा कोणीतरी बोलाव,हसावं..अहो ते सुद्धा एका प्रकारे संजीवच आहेत ना???