Friday, November 13, 2009

आठवणीतली साठवण..

ही एक छोटीशी साठवण:):):).पण आपल्याला ही बरच काही सांगूनहि जाते हा...म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे कि,मित्रानो तुम्ही कधी झाडांशी बोलून बघितलं आहात का? आ मला माहित आहे..आता तुम्ही हे बोलाल कि,हि काय मूर्ख मुलगी आहे??..हलीच्या दिवसात आम्हाला आमच्या घरातल्याशी,मित्रमंडळीशी एवढंच काय तर शेजाऱ्याशी सुद्धा बोलायला वेळ नाही.मग त्यात झाडाशी काय कर्म बोलणार आम्ही!!!..अहो हो..पण मला अस सांगायचं आहे कि ..म्हणजे हि माझ्या आठवणीतली साठवण..म्हणजे माझ्या लहानपनीची आठवण हो!!.जेव्हा मला हि उनाडकीगिरी करायला भरपूर वेळ असायचा आणि मग असच काहीतरी करत राहायचं..आता एकदम मुद्याचच सांगते हा,आमच्या घरी ना एक सुंदर जास्वंदीच भल मोठ झाड होत आणि त्यावेळी त्या झाडाला नियमित पाणी घालणे,खत घालणे.धूळ बसलेल्या पानांनवर पाणी शिपंडणे..इत्यादी हि सगळी माझी काम मी करत असायचे.अगदी कहर म्हणजे तीसुद्धा दिवसातून ४ / ४ वेळा?? आणि एके दिवशी माझ्या अस लक्षात आल कि,हे माझ जास्वंदीच झाड अचानकपणे फुलं देइनास झालय???दिवसाला जे १२ - १५ फुले दयाच आणि त्यामुळे आमचा संपूर्ण देव्हारा हा लाल रंगाने उजळून दिसायचा.:):)पण अस झाडाला आता झाल तरी काय?? ..आईला सुद्धा मी, हाच प्रश्न विचारून हैराण केल?त्यावर ती मला म्हणाली कि,तू एक काम कर..तूना विचार तुझ्या झाडाला कि, अरे तुझ काही बिनसलं.का?रागवलास का?की मी काही चुकीच वागले तुझ्याशी,बोल त्याच्याशी जरा.नुस्त पाणी घालून आणि त्याची निगा राहून चालत नसत.ते सुद्धा संजीव जीवच आहेत ना?मग त्यांना नाही बोलावस वाटत?, ए ऐकावस वाटत?त्यानाही माणसांसारख्याच भावभावना असतात आणि मग... मग मी माझ्या झाडाशी बोलले,त्याला विचारल.... तू रागवला आहेस का?का कळ्या येत नाहीत तुला,असा का तुझा रंग काळपट पडला.मी काही चुकीच वागले का?त्यावेळी मी एकटीच वेड्यासारखी झाडाशी किती वेळ बोलत असायचे..आणि हे माझ झाड मला काही उत्तर बोलूनच दाखवायचे नाही?.ते,ते देणार तरी कस??पण माहित आहे तुम्हाला ह्या माझ्या झाडाने माझ्या प्रश्नाच उतर हे मला जरी बोलून नाही दिल ना पण ते त्याने करून दाखवलं..माझ्या ह्या झाडाने त्यावेळी १ आठवड्याच्या आत कळ्या दिल्या:):):)आणि नवल म्हणजे त्याच्या फांद्यानावर,पानांनवर,मुळांवर एक तजेला आला आणि आता ते परत पाहिल्यासारख हसायला लागल:):):)

सांगायचा मुद्दा हा कि,बघा मित्रानो..आपल्यासारखंच झाडा-फुलांना सुद्धा वाटत ना कि,त्यांच्याशीसुद्धा कोणीतरी बोलाव,हसावं..अहो ते सुद्धा एका प्रकारे संजीवच आहेत ना???

3 comments:

  1. hmm... khare aahe... jhada phulanna pan ase watte ki koni tyanchshi bolawe, gappe marave... science ni suddha he prove kele aahe ki jhada phulanna jar changle sangeet aikavle tar te jaste phultat ani wadhtat... tya shivay te aaple changle mitra pan banu shaktat, apan man mokle panane tyachashi bolu shato, ani te jhulun uttar he detat... tyanna baghitle ki kiti anand hoto, prasann watte... nisarga chya kushit basun saare jag visrun jawese watte nna???

    ReplyDelete
  2. nice yar yevadhe kase kay suchate tumhala
    kalpana changali aahe

    ReplyDelete
  3. suchitra khup mast ahe re tuzi आठवणीतली साठवण...mala khup awadle.

    ReplyDelete