Thursday, February 1, 2018

माझं पुस्तक प्रेम :)



                                  माझं पुस्तक प्रेम
Read more see more   : आता सामानाची बांधाबांध करताना मला माझा आवडता खजिना सापडला. होय हाच तो पुस्तकरुपी खजिना. तरी ह्यातश्यामची आई” हे पुस्तक अजून हाताशी पडलेलं नाही . कुठे हरवलं आहे घरात तेच सापडत नाही. आणि श्यामची आई हेच माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे . किमान वेळा तरी मी ते आतापर्यंत वाचून झालं असेल , जेव्हा मन खूप उदास असतं तेव्हा साने गुरुजींच अजरामर असं आईबद्धलची आत्मकहाणी “श्यामची आई” वाचायचं. पुस्तक वाचताना खरीखुरी आपली आई डोळ्यासमोर येते. दुसरं आवडणार पुस्तक म्हणजे कादंबरी  शिवाजी सामंतांची  “ मृत्युंजयकादंबरी,  मी १२ वीला असताना ही कादंबरी विकत घेतली , ही कादंबरी  महान , दानशूर कर्णाची , त्याच्या संपूर्ण आयुष्याची व्यथा सर शिवाजी सामंततानी दर्जा स्वरूपात मांडली आहे. फक्त कर्ण वाचावा म्हणून ही कादंबरी जशी समोर येईल तशी वाचते. फक्त कर्णासाठी. त्यावेळी मला मी मृत्युंजय कादंबरी हवीच , मिळावी म्हणून किती तरी दुकाने फिरून झाली , माटुंगा मार्केट , दादरची दुकान , ठाणे , मारिन लाईन मधलं एक पुस्तक दुकान जिथे ही बऱ्यापैकी मिळतात पुस्तके , कोणा कोणा ला विचारत राहिलेले , लायब्ररीत रोज जायचे फक्त कादंबरी वाचायला , ) पण तेव्हा ती हातात यावी हा योग नव्हता. मग अचानक कुठून तरी समजलं फोर्टला हुतात्माला मिळतात पुस्तक , मग तिथे जाऊन दोन दिवसात खरेदी केलं . बाकी अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष केलं मुदाम केलं , जेव्हा घरी समजलं मी अभ्यास सोडून नुसतीच कादंबरी पुस्तक वाचते आहे आणि परीक्षेत मार्क्स किमान पास होईन एवढे मिळतं आहेत त्यावेळी मग खूपखूपखूप नको तेवढा ओरडा पोट भरून खालला , वाचनाचं एवढं वेड लागलं होत अचानक कि, मी परीक्षेला पेपर एक आणि अभ्यास दुसराच करून गेले होते. अभ्यासाशी माझं काही घेणंदेणंच नव्हतं असं झालं होत , घरच्यांनी विचारलं आज पेपर कोणता? तेव्हा मी चुकीचा पेपर सांगितला होता आणि exam timetable मुळे घरच्यांना खरा कोणता पेपर हे आधीच माहित होत . तेव्हा परत प्रसाद हवा तेवढा मिळालाच , (माझी एक खासियत आहे मला लहान पणापासून ते आजपर्यंत फुकटचा ओरडा हा अजूनही मिळतो , मग चूक असो किंवा नसो , पण ओरडा खाणं हे पाचवीलाच पुजलं आहे माझ्या. त्यानंतरप्रवाळदीप”  ह्या कादंबरीच्या नावातच गुपित , रहस्य , कुतूहल लपलेलं आहे . जशी मृत्युंजय कादंबरी एकदा का वाचायला घेतली कि वाचत राहावी असं आहे तसंचप्रवाळदीप” पुढे काय होईल ? काय होतंय? हे  जाणून घ्याचं कुतूहल वाढतं! मग सावरकरांची आत्मकथामाझी जन्मठेप” ही  सावरकरांची आत्मकथा , त्यात  वीर सावरकराना दोनदा मोठी अशी जन्मठेपेची शिक्षा झाली आणि ही शिक्षा सहन करत असताना जे अंदमानतल कठोर जीवन , मृत्यूशी झुंज , मृत्यूला हरवणं , इंग्रजांच्या हातावर तुरी , हे सार वर्णन वाचून कसं? किती? केवढं? सहन केलं ह्या महावीर योध्दयानें ते कळत. ही आत्मकथा वाचताना मी नवीनच नोकरीला लागले होते आणि बसमधला एक तासाचा  प्रवास , हातात पुस्तक घेऊन ते वाचत बसणं हे रोजच ठरलेलं. आधीआधी स्टॉप आला कि कळायचं. पण नंतर जस जशी आत्मकथा पुढे जात राहिली , तसं तसं स्टॉप कधी यायचा हे विसरून जात होते . रोज  Driver / Conductor काकांचा ओरडा असायचा “ अहो,  मॅडम स्टॉप आला तुमचा उतरा , संपलं तिकीट ” . मग मी हडबडून आजूबाजूला बघायचे .
माझं पुस्तक वाचनाचं वेड अस आहे कि,  आली लहर केला कहर .. अचानाक कोणतरी पुस्तक डोक्यात येत मग ते शोधत राहायचं , कुठे कुठे मिळेल तिथे फोन करून करून विचारायचं , आणि एकदा का हातात पडलं कि पूर्ण वाचूनच काढायचं मग किती कोणतं काम महत्वाचं असो आणि मग ठरल्याप्रमाणे ओरडा खायचा . इतर कामाकडे दुर्लक्ष / इतर काम लक्षात ठेवणं (हे घरातल्या कामाबाबत फक्त बरं का) .
तसेच अजून  पु. . देशपांडे ची वक्ती आणि वल्ली गणगोत असा मी असामी  बटाटयाची चाळ , वीणा गवाणकरच एक होता कार्व्हर , व्यंकटेश माडगूळकरची बानगरवाडी वाचायची आहे

No comments:

Post a Comment