असा आणि एवढाही निगरगठ्ठपणा असू शकतो ?
सांगायचा मुद्धा हा कि , माझी रोज मला न चुकता भेटणारी अशी एक मैत्रीण आहे . सध्या तिची health थोडी down आहे . तिला आज तिला रोजच्या प्रमाने भेटले, तेव्हा ती रोजच्या सारखी तेवढी उत्साही आनंदी वाटलीच नाही . मी तिला म्हंटल , "होशील ग बरी , संकट कितीही आली तरी खचू नकोस धीर सोडू नकोस , मनाची इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेव .तेव्हाच संकटातून मार्ग काढशील आणि पटकन बरीही होशील." अर्थात मला हे सगळं ज्ञान तिला सांगणं तेवढं मोठेपणाच वाटलं नाही कारण ती तशीच होती. पण एक बोलण्यातून धीर देणं फार गरजेचं असतं ह्यावेळी जरी आपण काही मदत नाही करू शकलो तरी.
ह्या माझ्या मैत्रिणीने तेव्हा बोलताबोलता मला विचारलं "ताई , खरंच काही व्यक्ती, म्हणजे आपल्याला ज्यांचे अनुभव आले आहेत असे लोक निगरगठ्ठ असू शकतात का ओ ?" मी म्हंटल का ग काय झालं ,एवढा विचार का आणि कशाला करतेस ? पण ती बोलली " नाही विचार नाही करत, पण मनात सहज १ सेकंद डोकावून जातंच कि का असं? आपण तर वाईट वागलो नाही .उलट जेवढं जमेल तसं आणि त्यापरीने मदत केली पण ती व्यक्ती फक्त गरजेपुरतीच आपला विचार करते आणि केला." माणुसकी काय ,हे तिला माहीतच नाही आहे!! म्हणजे माझी मैत्रीण सांगत होती कि,ती मध्यन्तरी खूप आजारी होती .अगदी घराबाहेर पडणं सुद्धा अशक्य झालं होत आणि तिने ज्या चांगल्या मनाने-भावनेने कोणा एका व्यक्तीला तिच्या कामामध्ये मदत केली होती . ती मदत ही खूप काही होती . मदतीच्या वेळेस ती व्यक्ती सतत गुलुगुलु बोलून काम साधून घेत होती. माझ्या मैत्रिणीला ते सगळं समजत, कळत होत पण तिचा स्वभाव असा कि , जाऊंदे ना आपल्यापासून कोणाला काही त्याच्या वैव्यहाराला हातभार लागतो तर काय होतंय ? कोणाचं भलं तर होत आहे ना? ह्या भावनेची विचारांची. पण माझी मैत्रीण जेव्हा खरंच खूप आजारी पडली तेव्हा ती व्यक्ती तिला ढुंकून बघायला आली नाही कि साधी विचारपूस नाही . म्हणजे " गरज सरो आणि वैद्य मरो " ह्यातली .बाजूने गेली तरी काही विचारणं नाही . माझी मैत्रीण म्हणत होती तिला कोणाच्या दयेची गरज नाही पण माणूस जर रोजच्यापेक्षा काही बाबतीत health मध्ये कमी जास्त वाटला तर आपण एक माणुसकी म्हणून विचारतो .आणि इथे तर ? असो .काय बोलायचं !! त्यात आजचच उदाहरण तिने सांगितलं , तिला नीट चालणं अशक्य म्हणून खूप कठीण प्रयास करत माझ्या मैत्रिणीची मेगा ब्लॉक लागलेली झुकझुक गाडी चालू होती त्यात माझी मैत्रीण ही किंचित दिव्यांग वर्गात मोडणारी आणि ती निगरगठ्ठ व्यक्ती माझ्या मैत्रिणीच्या पाठीच चालत होती .पण प्रॉब्लेम काय , हे विचारेल तर शपथ ? एवढा निगरगठ्ठपणा ? का ? कशाला ? जीने चांगल्या मनाने मदत केली तिला . अगदी प्रॉफिट होई पर्यंत !!असो
इथे मी तिला सांगत होती नको ग एवढा विचार करू . पण अस ऐकल्यावर मी पण ५ मिनिटं विचारच करत राहिले .का ती व्यक्ती एवढी 'कामा पुर्ती मामा ' आहे ? होती ! कि तिला माणुसकी हा शब्दच मुळात माहित नाही.असो!!!..काय बोलायचं ?
मी फक्त माझ्या मैत्रिणीला सांगितलं मला तुला हक्क नाही काही तत्वज्ञान शिकवण्याचं , पण जे आपल्या कठीण - संकटाच्या प्रसंगी आपल्या बाजूने , आपल्या पाठी उभे असतात , राहतात तेच खरे आपले असतात . मग त्यांची ती मदत कितीही छोटीशी का असेना , जे न विचारता ,बोलता समजून घेतात तेच आपले असतात. आणि तेव्हाच आपल्या आजूबाजूचं जग काय -कस आहे हे कळत असत आणि अश्या चांगल्या लोकांना आपण कधीच विसरू ही नये .
No comments:
Post a Comment