मी तसा सहसा ट्रेनने प्रवास कधी करत नाही...त्या दिवशी आम्ही गणपतीला जेव्हा आमच्या घरी गेलो होतो तेव्हा ठाणे स्टेशनला होतो. परत घरी येत असताना तेव्हाची ही गोष्ट : स्लो ट्रेनची वाट बघता बघता फास्ट ट्रेन आली.बहुदा जे लोक ट्रेनने रोज प्रवास करत नाहीत त्यांचा ऐनवेळी खुप गोंधळ उडतो. घाईघाईत ट्रेन पकडायची अणि त्यावेळी जर का सम्पूर्ण कुटुंब प्रवास करत असेल तर मग चूकामूक होण्याची पण संभावना असते अणि अशीच एक चुकामुकिची गोष्ट घडली कि जे जिवावर पण बेतल असत.
आम्ही ट्रेन पकडली अणि एक मुलगी,माझ्यामते ती आठवी -- नववीला असेल..ती एकटीच ट्रेनमधे चढली अणि तीच सम्पूर्ण कुटुंब हे तसच प्लाटफॉर्मवर राहिले.त्याना स्लो ट्रेन पकडायची होती.जेव्हा त्या मुलीच्या वडीलाना हे समजल की आपल्यातली एक वक्ती कमी आहे तेव्हा तिचे पप्पा मोठ मोठ्याने ओरडायला लागले की,बाहेर ये बाहेर ये...अणि तोपर्यंत ट्रेन ही चालू पण झाली होती.जवळ जवळ तिचा वेगही वाढत होता..अणि ही मुलगी तिचे पप्पा हे हाका मारत आहेत म्हणून बाहेर उडी मारायचा प्रयत्न्न करू लागली..तिला तिथे असलेल्या इतर महिलानी अड़वल पण कोणाचही न ऐकता तिने सरळ धावत्या ट्रेन मधून उडी मारली..तीच नशीब चांगल म्हणुन ती प्लाटफॉर्मवरच पडली.
पण मित्रहो, मला एक कळत नाही की ट्रेन चालू झाली म्हणून काय झाल??ती मुलगी तशी मोठीच होती. आणि तिला तिच्या घराचा पत्ता तर माहित असणारच ना.मग पुढच्या स्टेशनला उतरून तिने तो पोलिसांना सांगितला असता . एवढ ट्रेनमधून उडी वगेरे मारण्याची काही गरजच नव्हती आणि घरातल्यानीसुधा हे लक्षात घ्यायला हवं होत कि , जर का आपल्याला कुठे गर्दीच्या ठिकाणी लहान मुलाना घेवुन जायच असेल तर त्याना आधीच कल्पना देवून ठेवावी की,काही पुढे चुकलात तर अधी पोलीसाना गाठा अणि आपल्या घरातल्यांचा फ़ोन नंबर अणि घरचा पत्ता सांगा.मग लहान मुलाहि तेवढीच सतर्क राहतील अणि असे जिवावर बेतनारे अपघात टळतील..
karan train chi ticket tichya papa kade rahili asel.. t.c. pakadel mhanun bhitine bhicharine udi marali asel. either tila train madhun udi marun he dakhvayach asel ki yenarya commenwealth sport sathi mi sudha eligible aahe.
ReplyDelete