Wednesday, September 29, 2010

Sugran

 
सुगरण :  हम्म...बरोबर ओळखलत मला कोणाविषयी सांगायच आहे ते...अहो पण ही जी सुगरण आहे ना.. ती केव्हाच तीच घर स्वता बांधत नाही तर हे घर म्हणजे सुग्रनिचा खोपा हा तिचा पति म्हणजे male बिरद बांधतो. ते सुधा तो एका वेळी ४ किवा ५ खोपे बांधतो.मग सुगरण ही ते सगले खोपे बघते.तिला जो खोपा आवडतो तो ती रहायला नीवडते अणि मग सुगरण ही तीने नीवडलेल्या खोप्यात पिलाना जन्म देते.
मला इथे हे सांगायच आहे की...पक्षी पण किती सुरेख अणि सुन्दर अशी घरटी बांधतात ना !!! झाडाच्या सुकलेल्या वेळी ,वाळलेली पाने ,वाळलेल्या काड्या जमा करून ते कुठल्या ही धाग्याचा वापर न करता ही घरटी बांधतात..अणि ही घरटी पावसात केव्हाच तुटत सुधा नाहीत की पिलाना दुखापत ही होत नाही..नाहीतर आताची माणसानी बांधलेली घरे केव्हा कोसळतील त्याचा नेम नसतो ...थोड्या पैश्याच्या लालसेपोटी इथे ही माणुस भ्रष्टाचार करतो अणि मानवच मानवाचे प्राण घेतो...हे मी काही नविन असे सांगत नाही पण मनात आल सो ब्लॉगच्या माध्यमाने सांगण्याचा परत  एकदा छोटासा प्रयंत्न केला.  



Saturday, September 18, 2010

it's a total madness !!!!!

मी तसा  सहसा ट्रेनने प्रवास कधी करत नाही...त्या दिवशी आम्ही गणपतीला जेव्हा आमच्या घरी गेलो होतो तेव्हा ठाणे स्टेशनला होतो.  परत घरी येत असताना तेव्हाची ही गोष्ट : स्लो ट्रेनची वाट बघता बघता फास्ट ट्रेन आली.बहुदा जे लोक ट्रेनने रोज प्रवास करत नाहीत त्यांचा  ऐनवेळी खुप गोंधळ उडतो. घाईघाईत ट्रेन पकडायची अणि त्यावेळी जर का सम्पूर्ण कुटुंब प्रवास करत असेल तर मग चूकामूक होण्याची  पण संभावना असते अणि अशीच एक चुकामुकिची गोष्ट घडली कि जे जिवावर पण बेतल असत.
 आम्ही ट्रेन पकडली अणि एक मुलगी,माझ्यामते ती आठवी -- नववीला असेल..ती एकटीच ट्रेनमधे चढली अणि तीच सम्पूर्ण कुटुंब हे तसच प्लाटफॉर्मवर राहिले.त्याना स्लो ट्रेन पकडायची होती.जेव्हा त्या मुलीच्या वडीलाना हे  समजल की आपल्यातली एक वक्ती कमी आहे तेव्हा तिचे पप्पा मोठ मोठ्याने ओरडायला लागले की,बाहेर ये बाहेर ये...अणि तोपर्यंत ट्रेन ही चालू पण झाली होती.जवळ जवळ तिचा वेगही वाढत होता..अणि ही मुलगी तिचे पप्पा हे हाका मारत आहेत म्हणून बाहेर उडी मारायचा प्रयत्न्न करू लागली..तिला तिथे असलेल्या  इतर महिलानी अड़वल पण कोणाचही न ऐकता तिने सरळ धावत्या ट्रेन मधून उडी मारली..तीच नशीब चांगल म्हणुन ती प्लाटफॉर्मवरच पडली. 
 पण मित्रहो, मला एक कळत नाही की ट्रेन चालू झाली म्हणून काय झाल??ती मुलगी तशी मोठीच होती. आणि  तिला तिच्या घराचा पत्ता तर माहित असणारच ना.मग पुढच्या स्टेशनला उतरून तिने तो पोलिसांना सांगितला असता . एवढ ट्रेनमधून उडी वगेरे मारण्याची काही गरजच नव्हती आणि घरातल्यानीसुधा हे लक्षात घ्यायला हवं होत कि , जर का आपल्याला कुठे गर्दीच्या ठिकाणी लहान मुलाना घेवुन जायच असेल तर त्याना आधीच कल्पना देवून ठेवावी की,काही पुढे चुकलात तर अधी पोलीसाना गाठा अणि आपल्या घरातल्यांचा फ़ोन नंबर अणि घरचा पत्ता सांगा.मग लहान मुलाहि तेवढीच सतर्क राहतील अणि असे जिवावर बेतनारे अपघात टळतील..